स्वप्नात येउन देवाने देऊ पाहिला स्वर्ग,
नको म्हटले, नाही सोडायचा पृथ्वी वरचा निसर्ग.
असेल जरी होत त्याचा ऱ्हास, बाप आहे तो अमुचा,
कमी होईल त्याला त्रास निश्चय करू मनाचा.
थांबवू डोंगरफोडी, आणि थांबवू लाकूडतोडी,
कमी करू त्या साऱ्या गोष्टी,ज्या उगाच धूर सोडी.
स्वच्छ करू त्या नद्या साऱ्या, स्वच्छ करू ते नाले,
मग स्वच्छ राहील तो समुद्र, ज्याला सारे जाऊन मिळाले.
देवा! स्वर्गाहुनी मोहक होईल, हा माझा निसर्ग,
माणसाचे स्वभाव सुधारले कि म्हणशिल ह्यालाच - स्वर्ग.
-RiskyCase
Comments